पोलिसांची बदनामी थांबणार कधी
सांगली: अलिकडे स्वतःवरील सिद्ध झालेले आरोप खोडून काढण्यासाठी पोलिस दलाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याची शंका येत आहे. त्याशिवाय अनेकदा पोलिसांवर विनाकारण आरोप केल्याचे प्रकारही घडले आहेत. नुकताच चोरीतील सोने लपवणाऱ्या संशयिताने पोलिसांवरच आरोप केले आहेत. वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे पोलिसांचे मनोधैयर् खच्ची होत आहे. दरम्यान त्यामुळे पोलिसांची बदनामी थांबणार कधी असा प्रश्न निमार्ण होत आहे.
केवळ सांगलीच नव्हे तर राज्यात पोलिस दलाच्या कामकाजाबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कायर्क्षमतेवर परिणाम होताना दिसत आहे. अनेक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बऱ्याच जणांकडे चौकशी करावी लागते. गुन्ह्यातील सत्य बाहेर काढून खऱ्या गुन्हेगारावर कारवाईसाठी पोलिस नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र चौकशी झालेल्यांपैकी काहींना चौकशीचे शल्य वाटते. त्यामुळेच असे दुखावलेले लोक पोलिसांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलिस न्याय प्राधिकरण, वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करत असतात.
अनेकदा पोलिसांनी कारवाई केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचे नवीन फॅड निघाले आहे. शिवाय माहिती अधिकारात माहिती मागवूनही पोलिसांना त्रास दिला जातो. समजा पोलिसांनी एखाद्यावर खोट्या आरोपात किंवा गुन्ह्यात अटक केली तर संबंधिताला न्यायालयात उभे केल्यानंतर त्याची बाजू स्वत किंवा वकिलांमाफर्त मांडण्याची मुभा असते. त्यावेळी न्यायालयही संबंधितांना पोलिसांनी मारहाण केली का किंवा अन्य काही त्रास दिला का अशीही विचारणा करते. त्यावेळी मूग गिळून बसणारे जामिनावर बाहेर आल्यानंतर मात्र पोलिसांवर आरोप करतात असे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवर आरोप होत असल्याने संपूणर् पोलिस दलाचे मनोधैयर् खच्ची होत आहे. शिवाय अशा आरोपांमुळे यापुढे अनेक गुन्ह्यात पोलिस सखोल तपास करतील का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.