सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मागितली माफी
वक्तशीरपणा हे एक मानवी मुल्य आहे. माणसाच्या यशस्वीपणाचे मोजमाप त्याच्या वक्तशीरपणावर अवलंबून असतं. याचे ताजे उदाहरण म्हणजे देशाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड. काही दिवसांपूर्वी त्यांना कोर्टात पोहोचायला 10 मिनीटे उशीर झाला आणि त्यांनी सगळ्यात आधी सर्वांची माफी मागितली. त्यांच्या या कृतीतून त्यांची नम्रता आणि वक्तशीरपणा अधोरेखित होतो.
एका वृत्तानुसार, देशाचे सरन्यायाधिश धनंजय यशवंत चंद्रचूड यांना एकदा कोर्ट रूममध्ये पोहोचायला 10 मिनिटे उशीर झाला. जेव्हा ते कोर्टात आले तेव्हा त्यांनी सर्वात आधी न्यायालयात उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागितली. पुढे ते म्हणाले, 'माफ करा, मी सहकारी न्यायाधीशांशी काहीतरी चर्चा करत होतो… त्यामुळे मला उशीर झाला.'
याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह यांनी याबाबतचा किस्सा प्रसारमाध्यमांना सांगितला. ते म्हणाले, एकदा धनंजय चंद्रचूड न्यायालयात उशीरा आले. त्यावेळी त्यांनी सगळ्यात आधी माफ करा, मी सहकारी न्यायाधीशांशी काहीतरी चर्चा करत होतो… त्यामुळे मला उशीर झाला.' असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, न्यायमूर्ती चंद्रचूड अतिशय शिस्तप्रिय आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात. तसेच इतरांनीही वेळेचे महत्व लक्षात घेऊन न्यायालयात पोहोचावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.