Bacardi च्या बाटलीवर वटवाघूळ का आहे?
मुंबई : जगभरात वेगवेगळ्या प्रकारची दारु प्यायली जाते. यासगळ्यात रमला थोड जास्त प्रमाणत महत्व दिलं जातं. रममध्ये देखील वेगवेगळे बँड उपलब्ध आहेत. लोक आपल्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे ब्रँड निवडतात. त्यात सगळ्या लोकप्रिय बँड पैकी एक बकार्डी देखील आहे. अनेकांनी ती प्यायली देखील असेल. पण कधी तुम्ही या रमवरील लोगो पाहिलाय का? हा एक दारुचा ब्रँड आहे, मग यावर एका वटवाघूळाचा फोटो का आहे?
असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? चला सर्वात जास्त चर्चेत असलेल्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ. रिपोर्ट्सनुसार, बकार्डी रमच्या बाटलीवर बॅटचा (वटवाघूळ) लोगो ऐतिहासिक आहे आणि हा लोगो सुरुवातीपासूनच बनवला गेला आहे. असे म्हटले जाते की बकार्डी रम कंपनीची स्थापना 1862 मध्ये फॅकुंडो बकार्डीने केली होती.
त्याची पहिली डिस्टिलरी क्युबामध्ये स्थापन झाली. स्थापनेच्या वेळी असे काही घडले की, तेव्हापासून वटवाघुळाला महत्व दिलं गेलं. वास्तविक, यासाठी जी जागा घेतली होती, तेथे अनेक वटवाघूळांचे वास्तव्य होते. तेव्हा छतावर खूप वटवाघुळं बसली होती, या वटवाघूळांना पळवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, पण तिथून एकही वटवाघुळ पळाला नाही.
ज्यानंतर याच गोष्टींना दाखवण्यासाठी वटवाघूळाचा वापर करण्यात आला. दारु जितकी जुनी तितकी चांगली, मग बिअरची एक्सपायरी डेट का असते? या मागची आणखी काही कारणं ही समोर असे म्हटले जाते की वटवाघुळ कुटुंबात चांगले आरोग्य आणि एकता आणते. म्हणून बकार्डीच्या बाटलीवर शुभेच्छासाठी वटवाघूळाचे चित्र ठेवले जाते. याव्यतिरिक्त, वटवाघळांना रम उद्योगाचे नैसर्गिक मित्र म्हटले जाते, कारण ते उसाच्या पिकांचे परागीकरण करतात आणि त्यांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकांची शिकार करतात. तेव्हापासून आजपर्यंत 160 वर्षांपासून हा लोगो बाटलीवर छापला जातो आणि याला ब्रँडचे चिन्ह किंवा लोगो म्हणून ओळखले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.