Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंधरा मिनिटात फिरवली 783 वेळा गदा

पंधरा मिनिटात फिरवली 783 वेळा गदा 



सांगली : पंधरा मिनिटात गतीने जास्ती जास्त वेळा गदा फिरविण्याची अनोखी स्पर्धा सांगलीत पार पडली या स्पर्धेत सांगलीच्या शुभम चव्हाण याने ७८३ वेळा गदा फिरवून प्रथम क्रमांक पटकावला. रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी सांगलीच्या गणेशनगर येथील रोटरी हॉलमध्ये गदा फिरवण्याची स्पर्धा पार पडली. कुरुंदवाड, शिरोळ, सांगलीवाडी, सांगली येथून वीस स्पर्धकानी भाग घेतला होता. दहा किलोची गदा फिरविण्यासाठी पंधरा मिनिटांची वेळ देण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष सचिन कोले यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच रामकृष्ण चितळे, समर्थ व्यायाम शाळेचे वैभव माईणकर, सुहास व्हटकर यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण पुण्यातील व्यावसायिक शैलेंद्र जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.

स्पर्धेत शुभम विनायक चव्हाण याने ७८३ वेळा गदा फिरवून प्रथम, सांगलीच्या हरी सदानंद महाबळने ७४५ वेळा फिरवून द्वितीय, शिरोळच्या अनिकेत परशुराम चव्हाणने ७०७ वेळा फिरवून तृतीय, तर पै. सुहास विलास माने याने ६९६ वेळा फिरवून चौथा क्रमांक पटकाविला. कार्यक्रमास सनतकुमार आरवाडे, रविकिरण कुलकर्णी, डॉ. श्रीनिवास नाटेकर, मनीष मराठे, नितीन शहा, सलील लिमये, डॉ. सुहास जोशी, डॉ. दिलीप पटवर्धन, संजय रानडे, उदय पाटील, अजय शहा उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.