विहिरीत पडून 5 वर्षाच्या चिमुकल्यांचा मृत्यू
सांगली : नेर्ले येथे माळी मळ्यातील शौर्य रवींद्र माळी (५) या चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद कासेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. शनिवारी अक्षय तृतीया असल्याने नेर्लेतील माळी मळ्यात सर्वांच्या घरी पूजेचे कार्यक्रम सुुरू होते. यावेळी शाैर्य माळी हा नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर जनावरांचा गोठा आहे. त्यालगतच विहीर आहे.
विहिरीच्या कडेला उतार असल्याने या ठिकाणी खेळत गेलेल्या शौर्य याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. यादरम्यान हा प्रकार विहिरीजवळ नैवेद्य पाण्यात सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ ही माहिती सर्वांना दिली. मळ्यातील सर्व लोक घटनास्थळी जमा झाले. शौर्यला विहिरीतून बाहेर काढून पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथे त्याला मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शाैर्यच्या पश्चात वडील, आई, आजी, आजोबा असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.