भारतातील व्हॉटसअपची 45 लाख खाती केली बंद
अश्लील, घोटाळेबाज आणि संशयास्पद मजकुराची देवाणघेवाण करणारी भारतातील 45 लाख खाती व्हॉटस्अॅपने बंद केली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ही कारवाई करण्यात आल्याचे व्हॉटस्अॅपने म्हटले आहे
2021 च्या डिजिटल मीडिया आचारसंहितेनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपणहून कारवाई करू शकतो तर सरकारने आदेश दिल्यावर कारवाई करणे बाध्य असते. त्याबाबत दर महिन्याला अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
व्हॉटस्अॅपने 1 ते 28 फेब्रुवारी या काळात संशयास्पद वाटणारी 12 लाख 98 हजार खाती आपल्या अधिकारात बंद केली. तर आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 45 लाख 97 हजार 400 खाती बंद करण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.