तब्बल 392 पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनावर केली कारवाई
पुणे: वाहतूक पोलीस फक्त सर्वसामान्य लोकांवरच कारवाई करतात म्हणून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते मात्र वाहतूक पोलिसांनी आता सर्वसामान्य लोकांसोबतच स्वतःला व्हीआयपी किंवा विशेष म्हणून घेणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. यामध्ये डॉक्टर सैन्य दलातील अधिकारी, शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्यासह काही पोलिसांचा देखील समावेश आहे. वाहतूक पोलिसांनी या संदर्भातली मागील पंधरा दिवसातली आकडेवारीच जाहीर केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारी सर्वाधिक कारवाई ही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसात कारवाई करण्यात आलेली आकडेवारी-मागील १५ दिवसातील चलन कारवाया...पोलीस - ३९२शासकीय सेवेतील अधिकारी - १६०पी एम पी एम एल - ३०एडव्होकेट / डॉक्टर - १५१सैन्यदल - ३५मीडिया - २७
वाहतूक पोलिसांच्या त्रासाला कंटाळून कालच पुण्यातील काही तरुणांनी अनोखी मोहीम सुरू केली होती. आमच्याकडे लायसन्स आहे आम्हाला अडवून तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवू नका असं म्हणत पुणेरी भाषेत टोमणे देखील मारले होते. मात्र या आकडेवारीतून वाहतूक पोलीस हे फक्त सर्वसामान्य लोकांनाच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक नागरिकावर कारवाई करतात हे दिसून येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.