डॉक्टरकडून 33 वर्षीय महिलेचा वारंवार लैंगिक अत्याचार
पुणे : डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱी घटना पुण्यातून समोर आली आहे. 33 वर्षीय महिला उपचारासाठी डॉक्टरकडे आल्यावर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज ठिकाणी कल्पना आनंद क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला आहे. मागील दीड वर्षांपासून म्हणजेच 1 जुलै 2022 पासून हा प्रकार घडत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
हा संपूर्ण प्रकार महिला मागील दीड वर्ष सहन करत होती. मात्र अखेर हा प्रकार वाढत गेल्याने पोलिसांकडे तीने धाव घेतली. या प्रकरणी पीडित महिलेने डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. अमित आनंदराव दबडे असं या नराधम डॉक्टराचं नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी कल्पनानंद क्लिनिक आहे. सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता पीडित महिला आल्यानंतर त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिच्या छातीला हात लावून परत या प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावत.
डॉक्टरने केलेल्या कृत्याचा निषेध
हा सगळा प्रकार घडत असताना अनेकदा डॉक्टरने इंजेक्शनच्या बाहण्याने कमरेवरचे कपडे खाली करण्यासाठी सांगत होता. त्यानंतर तिच्यावर बळजबरी करुन बलात्कार करायचा, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर काही दिवस महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर पोलिसांनी डॉक्टरांवर थेट कारवाई केली आहे. दवाखान्यातून डॉक्टराला अटक केली आहे. डॉक्टरने केलेल्या कृत्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.