इस्लामपूर राष्ट्रवादीचा 18 जागेवर दणदणीत विजय
इस्लामपूर : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी १७ जागा जिंकत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची बाजार समितीवरील सत्ता अबाधित राहिली आहे. भाजप-शिवसेनेच्या शेतकरी परीवर्तन पॅनेलचे हमाल गटातील उमेदवार संजय लाखे ७ मतांनी विजयी झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप- शिवसेनेच्या शेतकरी परीवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत झाली. सकाळी ८ वाजता येथील बचतधाम मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. हमाल गट वगळता सर्वच गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ७० टक्केच्या पुढे मतदान पडले. हमाल गटात मात्र भाजप-सेनेचा उमेदवार ७ मतांनी विजयी झाला. या गटा १० मतपत्रिका कोऱ्या होत्या. ती मते बाद ठरविण्यात आली. राष्ट्रवादीने फेर मतमोजणीची मागणी केली आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.