Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तेलंगणात 'Bye Bye Modi' चे पोष्टर्स..

तेलंगणात 'Bye Bye Modi' चे पोष्टर्स..


भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय  शनिवारी चौकशी करणार आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तपास यंत्रणेने अटक केली आहे. दरम्यान, या चौकशीपूर्वी तेलंगणातील हैदराबाद येथे जोरदार पोष्टरीबाजी पाहायला मिळत आहे. हैदराबाद येथील विविध ठिकाणी 'Bye Bye Modi' चे पोष्टर्स पाहायला मिळत आहेत. या पोष्टर्सवर इतर पक्षांतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचे फोटो दिसत आहेत. या पोस्टर्सवर महाराष्टातील नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यातील नेत्यांचेही फोटो आहेत. ज्यामध्ये हे नेते भाजपमध्ये गेल्यावर कसे बदलले आहेत हे त्यांच्या अंगातील भगव्या शर्टच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे.

बीआरएसच्या नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री सी चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कवीता यांना गुरुवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र,संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यात महिला आरक्षण विधेयक सादर करायचे असल्याने त्यांनी चौकशीसाठी शुक्रवारी हजर राहणार असल्याचे म्हटले होते. ज्याला ईडीने संमती दर्शवली होती. दरम्यान, आज त्यांची चौकशी होणार असल्याचे समजते.

ईडीने शुक्रवारी न्यायालयाला सांगितले की उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यामागे एक षडयंत्र. हे षडयंत्र विजय नायर यांच्यासह इतरांनी रचले होते. घाऊक विक्रेत्यांना असाधारण आणि नफ्यासाठी उत्पादन शुल्क धोरण आणले होते असे ईडीने न्यायालयाला सांगितल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. विजय नायर आणि बीआरएस नेते के कविता यांच्या भेटीबाबत ई़डीने न्यायालयाला माहिती दिली.

अंमलबजावणी संचालनालयाने राऊस न्यायालयाला असेही सांगितले की, खाजगी संस्थांना घाऊक नफ्याच्या 12 टक्के मार्जिनवर GoM बैठकीत कधीही चर्चा झाली नाही. आरोपी बुचीबाू गोरंटलाने खुलासा केला की तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि के कविता यांच्यात राजकीय परस्पर संमती होती. ज्यांनी विजय नायर यांचीही भेट घेतली होती. उल्लेखनीय म्हणजे, बुचीबाबू हे के कविताचे माजी लेखा परीक्षक आहेत आणि सध्या ते या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.