केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 25, : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार, दि. 26 मार्च 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, 26 मार्च रोजी सकाळी 5.12 वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. सकाळी 10 वाजता तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे विकास कामांचे उद्घाटन. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता मराठा सांस्कृतिक भवन सांगली येथे सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता एस.पी. ऑफिस आणि आयकॉन हॉटेलच्या पाठीमागे हनुमान हॉटेल येथे राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता शिवाजी स्टेडियम मिरज येथे फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती, त्यानंतर शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. रात्री 10.10 वाजता सांगली रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.