Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनादेश फसवणूक प्रकरणी कोल्हापूरच्या भामटयास कारावास

धनादेश फसवणूक प्रकरणी कोल्हापूरच्या भामटयास कारावास


सांगली: आरोपी हेमंत बळवंत जाधव रा.कोल्हापूर. यांनी फिर्यादी श्यामकुमार शिवाजीराव जाधव रा. सांगली
यांचे कडून सन 2014 साली फ्लॅट चा विक्री व्यवहार करणेकामी रु.9,67,000/- नोटरी करार करून घेतले तद्नंतर सन 2018 पर्यंत फ्लॅट देणेस टाळाटाळ केली व वारंवार पैसे परत देणेची मागणी केली असता
९,६७,००० चा स्टेट बँकेचा चेक दिला सदर चेक बाऊन्स झाला.

यानंतर फिर्यादी श्यामकुमार जाधव यांनी सांगली जिल्हा न्यायालयात हेमंत बळवंत जाधव याचे वर कलम NEGOTIABLE INSTRUMENTS ACT 138 अंतर्गत खटला भरला. कोर्टाने आदेश देऊन पण आरोपी न्यायालयात हजर झाला नाही यावर कोर्टाने आरोपी ला अटक वॉरंट काढले तरी आरोपी जवळपास ६ महिने फरार राहिला. शेवटी तो दि.17/12/2019 रोजी पोलिसांच्या कचाट्यात सापडला त्यानंतर खटला पुढे चालला व साक्षी पुरावे तपासाअंती आरोपी हेमंत बळवंत जाधव याने हेतूपूरक बोगस धनादेश देऊन श्यामकुमार जाधव यांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले.

यावर प्रथमवर्ग न्यायाधीश श्री व्ही.व्ही पाटील यांनी आरोपीस ३ महिने कारावास ठोठावला या एकूण रक्कम रुपये ११,६७,०००/- देण्याचे आदेश दिले. सदर रक्कम आरोपीने वेळेत न दिल्यास १ महिना अधिक कारावासाची शिक्षा ठोठावली. यामध्ये फिर्यादी तर्फे अडव्होकेट नरेश पाटील व अडव्होकेट नरवाडे यांनी काम पाहिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.