'पंतप्रधान स्वत:ला भारत समजतात.'; राहुल गांधींची जहरी टीका
नवी दिल्ली : लंडननंतर काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्यांच्या महिलांबाबतच्या विधानांवरून संसदेत दररोज गदारोळ होतो आहे. अशातच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले,’केरळमध्ये भाजपचे पंतप्रधान, भाजप आणि आरएसएस यांच्या मनात संभ्रम आहे. पंतप्रधान मोदींना ते स्वतःहा भारत आहे असे वाटते. पंतप्रधान हे भारतीय नागरिक आहेत, संपूर्ण भारताचे नाही. पंतप्रधान, भाजप किंवा आरएसएसवर हल्ला करणे हा कोणत्याही प्रकारे भारतावर हल्ला नाही, मी भाजपवर टीका करणे बंद करणार नाही.’
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘माझ्यावर वारंवार होणारे राजकीय हल्ले, आणि माझ्या घरी पोलिसांना पाठवले जात आहे, माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत, मात्र मी घाबरणार व्यक्ती नाही मला सत्यावर विश्वास आहे आणि नेहमीच सत्याचा विजय होतो.’ राहुल गांधी वायनाडमधील अनेक कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्यानंतर जाहीर सभेला संबोधित केल. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.