राहुल गांधींची पंतप्रधानांसह आरएसएसवर सडकून टीका
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या संसदेत भारत आणि इथल्या लोकशाहीविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.त्याचेच पडसाद सध्या भारतीय संसदेत उमटताना दिसत आहेत.सत्ताधारी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी म्हणून गोंधळ घालत आहेत. तर दुसरीकडे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.
केरळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपसह पंतप्रधान आणि भाजप हे सर्व एका गैरसमजात असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान हे स्वतःला एक भारत समजत आहेत..परंतु, पंतप्रधान हे केवळ या देशाचे नागरिक आहेत ते स्वतः एक देश नाहीत. तसेच भाजप, मोदी आणि आरएसएस यांच्यावरील हल्ला हा भारतावरील हल्ला नाही असे स्पष्ट करत पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, जर भाजप स्वतंत्रपणे काम करणाऱ्या यंत्रणाच वापर करून ते एकप्रकारे भारतावर हल्ला करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. याविषयी बोलताना त्यांनी, राजकीय टीका किंवा घरी चौकशीसाठी पोलिसांना पाठवण्याच्या कारवायांना आपण भीक घालत नसल्याचे सांगत मी सत्यावर विश्वास ठेवतो आणि सत्याचाच बाजूने नेहमी उभे टाकणार असल्याचे यावेळी म्हटले.
वायनाडमध्ये काही कुटुंबाना त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे हस्तांतर राहुल गांधी यांच्या उपस्थिती पार पडले यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच अनेक लोक भाजप, मोदी आणि आरएसएस यांच्या कारवायांना घाबरते. पण सत्ताधारी नेत्यांची अडचण हीच आहे कि मी त्यांच्या कोणत्याच कारवाईला घाबरत नाही, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान दिल्याचे पाहायला मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.