नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ, मुंबईत नागरिकांच्या जीवाशी खेळ
तुम्ही खरेदी करत असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? हे तपासून बघा म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण अनेक ठिकाणी दुधामध्ये भेसळ केली जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मुंबईमध्येही दुधात भेसळ होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या पोयसर परिसरात गुन्हे शाखेने छापेमारी करुन 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त, साहित्यही जप्त
मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या पोयसर परिसरात दुधात भेसळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्यही यूनीट 12 व अन्न व सुरक्षा विभागाने छापा जप्त केले आहे. विरय्या मल्लया चिराबोयना (46 वर्षे), रवी तेलू बिसखामय (30 वर्षे) आणि शंकर पेतय्या मंदरा (42 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. या तीन जणांविरोधात अन्न व औषध भेसळ विरोधी कायदा तसेच फसवणूक इत्यादी कलमांतर्गत समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तिघेही दूध विक्री करताना नफा मिळवण्याच्या हेतूने दुधात भेसळ करुन नागरिकांची जीवाशी खेळ सुरु आहे.
अनेक वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ होत असल्याचे समोर
कांदिवली बोईसर या परिसरात दुधात भेसळ करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी मागील काही वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करुन मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत होती, याबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनासोबत शनिवारी पहाटे कांदिवली पूर्वेकडील पोयसर भागातील काजुपाडा गावदेवी परिसरातील तीन घरांवर छापा टाकला. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोकुळ, अमूल या सारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या भरलेल्या आणि अर्धवट भरलेल्या पिशव्या आणि Adulterated milk भेसळीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखेसह अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.