Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील गरीब मुलींचा लग्नासाठी गुजरातमध्ये सौदा..

महाराष्ट्रातील गरीब मुलींचा लग्नासाठी गुजरातमध्ये सौदा..


महाराष्ट्रातील गरीब व अल्पवयीन मुलींचा राजस्थान व गुजरातमध्ये लग्नासाठी काही लाख रुपयांमध्ये सौदा होत असल्याची धक्कादायक माहिती विधान परिषदेतील लेखी उत्तरातून पुढे आली आहे. यासंदर्भात या वर्षी त्यासंदर्भात 24 गुन्हे नोंद झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

रासप आमदार महादेव जानकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. 2021 मध्ये महिलांचे विवाहासाठी अपहरण केल्याप्रकरणी 405 गुन्हे नोंद होते. विवाहासाठी 418 महिलांचे अपहरण झाले होते. त्यामध्ये 363 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तर या गुन्ह्यांमध्ये 448 आरोपींना अटक झाली होती.

2023 मध्ये राज्यात विवाहासाठी अपहरण करण्यात आल्याप्रकरणी 24 गुन्हे नोंद केले आहेत. राज्यातून गरिब व अल्पवयीन मुलींची राजस्थान व गुजरात राज्याच्या काही गावांमध्ये विवाहासाठी एक ते दोन लाख रुपयांमध्ये सौदा केला जातो, हे अंशतः खरे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

233 अल्पवयीन मुली बेपत्ता

मुंबईतून 2022 मध्ये 1330 अल्पवयीन मुली बेपत्ता होत्या, पैकी 1097 मुली सापडल्या आहेत. 18 वर्षावरच्या 4437 महिला हरवल्याची नोंद वर्ष 2022 मध्ये झाली होती. पैकी 3039 महिला सापडल्या आहेत, असे गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन रियुनाइट राबवण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.