Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांचा भ्रष्टाचार शिगेला पोहोचला- प्रशांत सदामते.

सांगली जिल्ह्यात शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांचा भ्रष्टाचार शिगेला पोहोचला- प्रशांत सदामते.

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात भ्रष्ट्र अधिकारी व कर्मचारी हे आपल्या अधिकारवाणीचा गैर उपयोग करून जनतेची व शासनाची फसवणूक करणे,भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती जमवणे,जनतेची कामे करून देण्यासाठी लाच घेणारे व निलंबित होणारे प्रशासनातील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी अव्वल क्रमांकावर आहेत,भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती कशी जमवायची हा प्रकार करण्यात सर्रासपणे सांगली जिल्हा अग्रभागी आहे,आठवड्याला तशा माध्यमातून बातम्या येत आहेत,प्रत्येक आठवड्याला एखादा अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडत आहेत अधिकार्‍यांना प्रति महिना लाखो रुपये पगार असूनही  दिवसभरात रोज फक्त एकच यांनी धंदा मांडला आहे कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय करायचे नाही  आणि दिवसभरात कामात गैरमार्गाने गैरकारभार करायचा आणि एजंटांच्या आणि चेलेचपाटांच्या मार्फत हजारो लाखो रुपये घरी घेऊन जायचे,प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असते.

टेंडर याच अधिकार्‍यांनी काढायची,टेंडर घेणारे यांचेच नातेवाईक, कामासाठी लागणारे माल मटेरिअल यांच्याच नातेवाईकांच्या कंपन्या फिरून फिरून सगळा पैसा या अधिकारांच्या घशातच,उद्योग भवन, कामगार आयुक्त कार्यालयात,आर टी ओ विभाग,कृष्णा खोरे विकास महामंडळ,जिल्हा परिषद,सहकार विभाग,पंचायत समिती,महापालिकेच्या प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती,अन्न व औषध भेसळ प्रशासना कडून कारवाई कमी तडजोडी जास्त असतात अशा अनेक विभागातील अधिकारी हे भ्रष्टाचार करून बेहिशेबी मालमत्ता जमवत आहेत.

जनतेची फसवणूक करून व शासनाचा महसूल बुडवून सर्रासपणे फसवून मायाजाल जमवत आहेत, यांच्या गैरकारभारा चा जर कोणी आवाज उठवला तर कोणीही कारवाई करायला तयार नसते, लोकांच्या कडे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे देऊन काम करून घेतल्याशिवाय पर्याय नसतो, कोण या तक्रार करणार असे म्हणत आपले काम झाले  आहे म्हणुन फारसे कोणी तक्रार करायला पुढे येत नसतात,पण राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी आता चंगच बांधला आहे, जर कोणी चुकीच्या पद्धतीने गैरकारभार करत असेल तर त्याला सोडले जाणार नाही, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा ही मिळायला हवी,आमच्यासारखे समाज जागृत कार्यकर्ते जर पुराव्यासह तक्रार द्यायला तयार झाले तर गेंड्याच्या कातडीचे प्रशासन कारवाईचा नुसता फार्स करते, कोणीही भ्रष्टाचाराच्या विरोधात गांभीर्याने घेत नाहीत एकमेकांना फक्त आणि फक्त पाठीशी घालायचे काम केले जाते, जिल्हाधिकारी कधीच अचानकपणे कोणत्याही विभागात जाऊन कारभाराविषयी माहिती घेत नाहीत.

आयकर विभाग तक्रार केल्याशिवाय काही करत नाहीत,सांगली जिल्हा हा भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला असून अनेक भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुराव्यासह कुंडल्याच काढल्या आहेत,आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार, पैशांचा गैरव्यवहार करून बेहिशोबी मालमत्ता जमवलेल्या भ्रष्ट अधिकारांची  तक्रार येत्या आठवडाभरात त्यांच्या वरीष्ठ विभागीय अधिकार्‍यांच्या कडे करून ,आयकर विभाग व ED- अमलबजावणी संचालनालय तसेच त्या त्या विभागाचे सचिव व संबंधित विभागाचे मंत्रिमहोदय,मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते यांच्याकडे देखील तक्रार देऊन मुंबई मराठी पत्रकार संघात या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या नावांची पुराव्यानिशी पोलखोल करणार आहे. 

राष्ट्र विकास सेनेच्या वतीने गेली आठ दिवस भ्रष्टाचाराच्या विरोध सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिवस रात्र बेमुदत आंदोलन करून न्याय न मिळाल्याने मी टोकाचे पाउल उचलत जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून पालकमंत्री यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता,त्याप्रमाणे माझ्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निवासस्था समोर अंगावर डिझेल ओतून घेतले व आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मी बचावलो पण माझ्या आंदोलनाची दखल न घेता उलट माझ्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, येणार्‍या काळात मी या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भ्रष्टाचार मुक्त सांगली व महाराष्ट्र हे अभियान राबवणार असून ज्यांना कोणी अधिकार त्रास देत असतील त्यांनी या अभियानात सहभागी व्हावे व 9892015006 या नंबरवर संपर्क करावेत आवाहन मी करत आहे, लवकरच अशा भ्रष्ट अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणी करून फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी प्रयत्न करणार व अशा हरामखोर अधिकार्‍यांना झेल मध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.