Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली एक्साईजचे नवे अधीक्षक प्रदीप पोटे ..

सांगली एक्साईजचे नवे अधीक्षक प्रदीप पोटे ..


अन्य तिघांनाही अधीक्षकपदी पदोन्नती..

मुंबई : सांगली एक्साईजच्या अधीक्षकपदी प्रदीप पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यवतमाळ, हिंगोली, बीड येथेही तीन अधिकाऱ्यांना अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी दिले आहेत. 

सांगली एक्साईजच्या तत्कालीन अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी वैयक्तिक कारणामुळे प्रतिनियुक्तीची मागणी केली होती. त्यानुसार गेल्याच देशमुख यांनी खादी, ग्रामोद्योग आयोगाच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सुमारे महिनाभरापासून सांगली एक्साईजचे अधीक्षकपद रिक्त होते. कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे यांच्याकडे तात्पुरता कायर्भार देण्यात आला होता. आज प्रदीप पोटे यांची सांगलीचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ते पदाचा कायर्भार स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले.   

 पोटे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतून एक्साईजमध्ये उपअधीक्षक म्हणून 2016 मध्ये दाखल झाले. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे उपअधीक्षक म्हणून कायर्रत आहेत. त्याशिवाय नितेश शेंडे यांची यवतमाळचे अधीक्षक, आदित्य पोवार यांची हिंगोलीचे अधीक्षक म्हणून तर विश्वजित देशमुख यांची बीडचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या चारही अधिकाऱ्यांना आगस्टमध्येच अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची नियुक्ती करण्यात आली. 

दरम्यान सांगलीतील गोवा बनावटीची दारू तस्करी, बनावट दारूची विक्री, हातभट्टी, गांजा, धाब्यांवर विकली जाणारी बेकायदा दारू, भेसळयुक्त ताडी यावर कडक कारवाई करण्याचे आव्हान असणार आहे. त्याशिवाय वेळेआधी सुरू होऊन नेमून दिलेल्या वेळेनंतर रात्री उशीरापयर्त सुरू असलेल्या जिल्ह्यातील बिअर बारवर कारवाई करण्याचे आव्हान असणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.