Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध कामासाठी ९४ कोटींचा निधी आमदार सुधीर गाडगीळ...

सांगली शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध कामासाठी ९४ कोटींचा निधी आमदार सुधीर गाडगीळ...


सांगलीतील दोन मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण;  आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठीही निधी..

सांगली :  सांगली शहरासह सांगली विधानसभा मतदार संघातील रस्ते, आयर्विन पुलाचे मजबुतीकरण व समांतर पुलाच्या सुशोभिकरणासाठी रस्ते रुंदीकरण करणेसाठी तब्बल ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. सांगली शहरातील प्रशिक चौक ते हरिपूर व कर्नाळ पोलीस चौकी ते शिवशंभो चौक हे दोन मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. 

आमदार गाडगीळ म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सांगलीतील नाट्यगृहासाठी २५ कोटीं च्या निधीची घोषणा केली. याशिवाय सांगली शहरासह विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसह विविध विकासकांमासाठी तब्बल ९४ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला आहे. सांगली शहरातील प्रशिक चौक ते हरिपूर काँक्रीटीकरण करणेसाठी १२ कोटी, शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी पर्यन्त रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी ७ कोटी, पुष्पराज चौक ते विश्रामबाग रस्त्यासाठी १३ कोटी, वारणाली रेल्वे ओव्हर ब्रीज ते कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर रस्त्यासाठी ४ कोटी, स्फूर्ती चौक ते सांगली मिरज रोडवरील आलदर चौक पर्यन्त रस्त्यासाठी ५ कोटी, सांगलीवाडी टोल नाका ते शिवशंभो चौक रस्त्यांसाठी २ कोटी, नावरसवाडी ते कर्नाळ रस्त्यासाठी ५ कोटी, मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्ता करणे ३ कोटी, हसरा चौक ते इनाम धामणी चौक 100 फूटी रस्त्यांसाठी ४ कोटी, शिरगाव फाटा खोतवाडी ते नांद्रे रस्त्यासाठी ३ कोटी, माधवनगर रोडवरील संपत चौक ते अहिल्यानगर आंबा चौक रस्त्यासाठी ६ कोटी, कर्नाळ ते बिसुर रस्त्यासाठी ४ कोटी, कर्नाळ रोड मसोबा मंदिर एम. आय. टी. स्कुल ते मौजे डिग्रज गाव रस्त्यासाठी ५ कोटीं निधी मंजूर झाला आहे. 

तसेच आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मागणीनुसार पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी सांगली मिरज रोडवरील होंडा शोरूम ते विश्रामबाग चौक रस्ता सुधारणा करणे- ११ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे हायब्रीड ॲन्युईटी (HAM) अंतर्गत डी.पी.आर. करणेसाठी ४३ लाख व आयर्विन पुलाची दुरुस्ती व समांतर पुलाच्या सुशोभीकरणसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असे भरघोस निधी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नांनी सांगली विधानसभेसाठी एकूण ११८ कोटी ४३ लाख इतका निधी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये मंजूर झाला आहे. असून याबाबत मुखमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानले. 

आमदार गाडगीळ म्हणाले, मतदार संघातील रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. याशिवाय सांगलीतील आयर्विन पुलाची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. तसेच आयर्विनला समांतर पुलाचे काम गतीने सुरू आहे. या पुलाचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांच्या कामासाठी तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हायब्रीड ॲन्युईटी (HAM) अंतर्गत डी.पी.आर. करणेसाठी कुमठे फाटा ते सांगली पर्यंत रोडसाठी 15 लाख तसेच जुनी धामणी इनामधामणी ते कुपवाड फाटा लक्ष्मी मंदिर ते कुपवाड ते तांनग पर्यंत रोडसाठी २७ लाख निधी मंजूर केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.