Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णामाई घाटावर भलताच कार्यक्रम...

कृष्णामाई घाटावर भलताच कार्यक्रम...


सांगली: कृष्णामाई घाटावर सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य असते. लव्हबर्डस्चा सुळसुळाट वाढला आहे. याठिकाणी स्मार्ट एलईडी दिवे कधी बसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या परिसरात दिवसा काही युवक गांजाची नशा करताना नजरेस पडत आहेत.

कृष्णा नदीकाठावर ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील स्मारक ते स्वामी समर्थ मंदिर या दरम्यान कृष्णामाई घाटावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उंच हायमास्ट दिवे बसवले होते. त्यानंतर ते महानगरपालिकेकडे हस्तांतर केले होते. मात्र, महापुरात हे विद्युत पोल पडले. त्यानंतर ते पुन्हा उभारण्यात आले. मात्र, त्यानंतर आलेल्या महापुरातही हे पोल पडले. सलग दोन महापुरात पडल्यानंतर हे पोल उभारले नाहीत. महानगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था म्हणून चार-पाच एलईडी दिवे बसवले आहेत; मात्र ते पुरेसे नाहीत.

सायंकाळनंतर कृष्णामाई घाटावर अंधार असतो. त्याचा गैरफायदा घेत गैरप्रकार सुरू आहेत. काही लर्व्हबर्डस्चा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. या ठिकाणाहून जाताना ज्येष्ठ नागरिकांना संकोेचल्यासारखे वाटते. कृष्णामाई घाटावरील अंधार दूर होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने एलईडी दिव्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. वसंतदादा स्मारकाच्या पिछाडीस नदीकाठाच्या बाजूला झाडाखाली काही नशेखोरांनी अड्डा बनविला आहे. घोळका करून गांजा ओढणारे काही युवक याठिकाणी दिसून येतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.