Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार असं काय म्हणाले?

अजित पवार असं काय म्हणाले?


राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही. आज देशासह जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान का दिलेले नाही. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी महिला मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका गोष्टीची खंत वाटते की एवढा मोठे आपले राज्य आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रीमंडळात एकही महिला नसणं हे कमीपणाचं वाटते. राज्य सरकारला ते शोभत नाही. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही, असे अजितदादा म्हणाले.

दरम्यान, आज एकाच मंत्र्याकडे अनेक खाती आहेत. असे असताना मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा चर्चेत होता. तसेच, मंत्रिमंडळामध्ये महिला मंत्र्यांना स्थान मिळावे, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, याचाही विचार या सरकारकडून झालेला नाही. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. मंत्रिमंडळात महिला नाही, ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गालाही योग्य वाटत नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.