Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसला मोठा धक्का...

काँग्रेसला मोठा धक्का..


आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला रामराम केला आहे. 11 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. किरण कुमार रेड्डी आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप हायकमांडसोबत ते संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही पार पडल्याची चर्चा आहे.

किरण कुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षाकडून सर्व काही मिळवले आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवण्याचे काम केले त्यांनी आता भाजपमध्ये जावे. असे मत काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी व्यक्त केले. रेड्डी यांनी यापूर्वी 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्याच्या तत्कालीन यूपीए सरकारच्या निर्णयावरून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी 'जय समैक्य आंध्र पार्टी' हा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला होता. परंतु 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

रेड्डी यांची राजकीय कारकिर्द मोठी आहे. 1989मध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि वायलपाडू येथून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. 1999 ते 2004 मध्ये त्यांची याच मतदारसंघातून आणि 2009मध्ये पिलेरू मतदारासंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. 2009मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या आणि किरण कुमार रेड्डी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. 11 नोव्हेंबर 201मध्ये ते मुख्यमंत्री बनले. मात्र आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्याच्या तत्कालीन यूपीए सरकारच्या निर्णयावरून त्यांनी 10 मार्च 2014 ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.