Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन छाटली बोटं

पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन छाटली बोटं


बार्शी तालुक्यात राजकीय आश्रयामुळे गुंडगिरी वाढली असून, आरोपी मोकाट सुटले आहेत. राजकीय आश्रयामुळे कायद्याची भीती नसलेल्या आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याबाबत पीडितेने पोलिसांकडे तक्रार दिली म्हणून दुसऱया दिवशी घरात घुसून पीडितेचे डोळे फोडले आणि सत्तूरने बोटे छाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेने जिल्हा हादरला आहे. घटनेनंतर पोलिसांनी नराधम आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या, तरी पोलिसांचा दरारा नसल्याचीच चर्चा सुरू आहे. अक्षय विनायक माने व नामदेव सिद्धेश्वर दळवी (रा. बळेवाडी, बार्शी) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींना वेळेत अटक न झाल्याने पीडित मुलीला आपले डोळे आणि बोटे गमवावी लागली आहेत. दरम्यान, या घटनेची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कारवाईत हलगर्जीपणा करणारे एपीआय महारूद्र परजणे, पीएसआय राजेंद्र मंगरूळे, डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल व हेड कॉन्स्टेबल भगवान माळी यांना निलंबित केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.