कर्मवीर पतसंस्थेत जेष्ठ संचालकांचा वाढदिवस संपन्न संस्थेच्या प्रगतीत संचालकांचे योगदान महत्वपुर्ण : रावसाहेब पाटील
सांगली :- सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी संस्थेचे जेष्ठ संचालक अॅड. एस. पी . मगदूम श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले व तज्ञ संचालक श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे यांचा संयुक्त वाढदिवस सोहळा येथील संस्थेच्या हॉल मध्ये आनंदाने साजरा करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. संस्थेच्या सर्व संचालकांनी संस्थेसाठी बहुमोल योगदान दिले असून आजचे सत्कार मुर्ती अॅड. एस. पी. मगदुम . श्री. वसंतराव नवले व श्री. लालासो थोटे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या प्रगतीसाठी महत्वपुर्ण योगदान दिल्याची आठवण त्यांनी केली. अॅड. एस. पी. मगदूम यांच्या वकिली व्यवसायाची तर लालासो थोटे यांच्या बँकीग ज्ञानाची व वसंतराव नवले यांच्या मनमिळावूपणे काम करुन घेण्याचा गुणाचा संस्थेला मोठा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना आरोग्यदायी, दिर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी संचालकांच्या कडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असून त्यांनी संस्थेसाठी आयुष्याची ३५ वर्षे दिल्याचा उल्लेख केला. सत्काराला उत्तर देताना सर्व सत्कारमुर्तीनी आयुष्यामध्ये आजपर्यंत सर्वाचे खुप सहकार्य व प्रेम मिळाल्याचे सांगितले. हा सर्वांनी केलेला गौरव सदैव स्मरणात राहील असे सांगितले. आपण सर्वजन मिळून संस्थेचा नावलौकीक आणखी वृध्दींगत करु असे आवाहन देखील सत्कारमुर्तीनी केले.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे यांचे सह संस्थेचा अधिकारी वर्ग उपस्थित होता. आभार व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.