सुरेखा शाहीन शेख दांपत्यांना सांगली प्राइड पुरस्कार.
सांगली:- गेली 25 वर्षे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत असलेले दांपत्य. सुरेखा व शाहीन शेख यांना शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय सांगली प्राइड पुरस्काराने, पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल येथे सन्मानित करण्यात आले. निराधार, बेघर, वंचित उपेक्षित, दुर्लक्षित, संकटग्रस्त महिला, बालक , मुली, देवदासी, वारांगणा, असाध्य रोगाने पीडित यांना सेवा. सुविधा, योजनांचा आधार व कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देऊन पुनर्वसन करणे.
महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक अधिकार, रेशन , आरोग्य अधिकार, अंधश्रद्धा निर्मूलन, जठा निर्मूलन, एड्स व क्षयरोग प्रतिबंध, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, आंतरजातीय व धर्मीय विवाह आदि व्यापक क्षेत्रात, तसेच बेघर महिला निवारा केंद्र व सखी- वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातूनही प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या ,उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन. सदर शेख दाम्पत्यांना 'सांगली प्राइड; पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता देशपांडे, डॉ. रवींद्र फडके, प्रा. वैजनाथ महाजन, निवेदक विजय कडणे यांच्या हस्ते व उपस्थितीत देण्यात आले असल्याचे, फाउंडेशनचे संयोजक राहुल रोकडे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.