Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे सरकारला चुंबनाचे वावडे...ठाकरे गटाची रोखठोक भूमिका

शिंदे सरकारला चुंबनाचे वावडे...ठाकरे गटाची रोखठोक भूमिका


चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? चुंबन प्रकरण हे अश्लील प्रकारात मोडते काय? नसेल तर मग शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक करण्याचे कारण काय? राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? असा सवाल ठाकरे गटाने रोखठोकमधून उपस्थित केला आहे. 

राज्यात एक जाहीर चुंबनाचे प्रकरण घडले. त्याने राज्याचं मनोरंजन होत आहे. शिंदे गटाच्या आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले. त्याचे लाइव्ह प्रक्षेपणही झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. त्यानंतर शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक केली. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट वेगाने सोशल मीडियातून पोहचते त्याला कुणाला दोष देणार? असा सवाल करतानाच मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे का? यावर निर्णय व्हायला हवा, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

सरकारला चुंबनाचे वावडे...

महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून अटका झाल्या. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा.

चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? श्री. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ 'लव्ह जिहाद'चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.