Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सरविरोधात मोठ शस्त्र! रक्तातून होणार निदान

कॅन्सरविरोधा मोठ शस्त्र! रक्तातून होणार निदान 




सांगली : विविध कारणांमुळे कॅन्सर रुग्ण वाढतच आहेत सुरुवातीची कालावधीत कॅन्सर निदान झाले तर संबधित रुग्णाला दिलासा मिळू शकतो त्यामुळे शरीरात वेगळी लक्षणं दिसताच तातडीनं तपासणी करणं गरजेचं आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी एमआरआय, सिटी स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी, ट्युमर मार्कर टेस्ट या तपासण्या केल्या जातात. पण आता कॅन्सरचे निदान लवकर आणि अचूक व्हावे,  यासाठी नवीन डिव्हाइस विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. या डिव्हाइसमुळे रक्ताच्या नमुन्याद्वारे कॅन्सरचे निदान करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इन्व्हेजिव्ह बायोप्सी सर्जरीची गरज भासणार नाही. 

हे डिव्हाइस नेमके कसे आहे, त्या विषयी जाणून घेऊया. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी स्टॅटिक ड्रॉपलेट मायक्रोफ्लुइडिक नावाचे डिव्हाइस विकसित केलं आहे. प्राथमिक ट्युमरपासून दूर गेलेल्या आणि रक्तात प्रवेश केलेल्या ट्युमर पेशींचा प्रसार वेगाने शोधणं या उपकरणामुळे शक्य होणार आहे.  या नव्या संशोधनामुळे डॉक्टरांना कॅन्सरचे निरीक्षण आणि रुग्णाची ट्रिटमेंट प्रक्रिया निश्चित करता येईल. या उपकरणासंबंधीचा सविस्तर अभ्यास नुकताच बायोसेन्सर्स अँड बायोइलेक्ट्रॉनिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अर्थात 'एनआयएच`ने दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये भारतात कॅन्सरच्या अंदाजे 14,61,427 केसेस आढळून आल्य. देशातील नऊपैकी एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते. हे नवीन उपकरण कॅन्सरच्या ट्युमर पेशी आणि नॉर्मल रक्तपेशींचं युनिक मेटॅबॉलिक सिग्नेचरच्या मदतीने वर्गीकरण करतं. या संदर्भात प्राध्यापक माजीद वारकियानी यांनी सांगितलं, ``1931 चे फिजॉलॉजी आणि मेडिसीनमध्ये नोबेल पारितोषिक विजेते ऑट्टो हेन्रिक वारबर्ग यांनी 1920 मध्ये कॅन्सर पेशी शरीरातील ग्लुकोज मोठ्या प्रमाणात वापरतात आणि त्या अधिक लॅक्टेट तयार करतात. 

हे लॅक्टेट अम्लीय असते, असा शोध लावला. हे उपकरण पेशींभोवतीचे आम्लीकरण शोधणारे, pH संवेदनशील फ्लोरोसेंट रंग वापरून वाढलेल्या लॅक्टेटसाठी एकल पेशींचं निरीक्षण करतं. एक मिलिमीटर रक्तातील कोट्यवधी रक्तपेशींमध्ये एकच ट्युमर सेल असू शकतो. त्यामुळे ट्युमर सेल शोधणं कठीण होतं. या नवीन शोध तंत्रज्ञानात 38,400 चेंबर्स असून ते मेटाबॉलिक अ‍ॅक्टिव्ह ट्युमर सेल्स वेगळ्या आणि वर्गीकृत करण्यास सक्षम आहेत. `` या उपकरणाने ट्युमर सेल्स ओळखल्या की जेनेटिक, मॉलिक्युलर अ‍ॅनालिसिस करता येईल. यामुळे डॉक्टरांना कॅन्सरचा प्रकार आणि निदान करता येईल आणि त्याआधारे रुग्णाच्या स्थितीनुसार ट्रिटमेंट प्लॅन तयार करणं शक्य होईल. 

संशोधनानुसार, संशोधन आणि क्लिनिकल लॅबच्या एकत्रिकरणाकरिता हे उपकरण डिझाइन केले आहे. यामुळे डॉक्टरांना व्यावहारिक आणि किफायतशीर पद्धतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांचं निदान आणि निरीक्षण करता येईल . सध्या कॅन्सरच्या निदानासाठी लॅबोरेटरी टेस्ट, इमेजिंग टेस्ट आणि बायोप्सी या तीन गोष्टींची मदत घेतली जाते, असं एनआयएचच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयुटने सांगितलं. कॅन्सरच्या निदानासाठी लॅबोरेटरी टेस्टमध्ये शरीरातील काही घटकांचे परीक्षण करुन काही पदार्थांचे स्तर शोधले जातात. रक्त,मूत्र आणि शरीरातील इतर द्रवांच्या चाचण्या या पदार्थांचे मोजमाप करतात. तसेच कॅन्सरच्या अचूक निदानासाठी बायोप्सी आणि इमेजिंग टेस्टची मदत घेतली 
जाते. ट्युमरच्या तपासणीसाठी सीटी स्कॅन, एमआरआय, न्युक्लिअर स्कॅन केला जातो. याशिवाय अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे देखील काढला जातो. बायोप्सीमध्ये अनैसर्गिक पेशींचा नमुना घेऊन तो मायक्रोस्कोप खाली तपासला जातो. बायोप्सी ही इन्व्हेजिव्ह असते. कारण ती निडल, एन्डोस्कोपी आणि शस्त्रक्रियेद्वारे केली जाते. ``बायोप्सीमुळे रुग्णाला त्रास होतो.

तसेच शस्त्रक्रियेमुळे जोखीम अजून वाढू शकते,`` असं या पेपरचे एक लेखक प्राध्यापक माजीद वायरकियानी यांनी युनिव्हर्सिटीच्या निवेदनात म्हटलं आहे. मेटास्टेसिस हे कॅन्सरशी संबंधित 90 टक्के मृत्यूचे कारण आहे. मेटास्टेसिसमध्ये कॅन्सर इतर अवयवांमध्ये पसरतो. लिक्विड बायोप्सी ही देखील कॅन्सर निदानाची प्रचलित पद्धत आहे. पण कॅन्सरच्या निदानासाठी ती नेहमीच विश्वासार्ह ठरत नाही.ही वेळखाऊ, महागडी पद्धत असून  यासाठी प्रशिक्षित ऑपरेटरवर अवलंबून राहावे लागते. यासर्व पार्श्वभूमीवर, हे नव्याने विकसित केलेल उपकरण केवळ रक्ताच्या नमुन्याच्या आधारे कॅन्सरचे निदान करू शकते. त्यामुळे लवकरच या उपकरणाचा व्यावसायिक वापर सुरू व्हावा यासाठी संशोधक नियोजन करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.