Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय - शरद पवार

देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय - शरद पवार


मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला केवळ चिंचवड राखता आले. गेल्या ३० वर्षांपासून भाजपकडे असलेला गड महाविकास आघाडीने जिंकला. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात अद्यापही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कसब्यात धंगेकरांना दोन ठिकाणी जास्त मते मिळाली आहे. हा बदल पुण्यात होत आहे. याचाच अर्थ लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले तसेच निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उभ्या केल्या होत्या त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत. पंतप्रधान आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेत्याचाही यात समावेश व्हावा. हा लोकशाहीमधील चांगला निर्णय आहे, असे मत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय

देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. पदवीधर निवडणुका जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकसुद्धा जागा मिळू शकली नाही. पुण्याच्या निवडणुकीबाबत काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये १२ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. याबाबत शरद पवार यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले आहेत.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.