Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक, रवींद्र कांबळेला अटक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक, रवींद्र कांबळेला अटक



सांगली : शेअर मार्केटच्या माध्यमातून अधिक रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.  रवींद्र शिवाजी कांबळे (रा. मिरज) असे त्याचे नाव आहे. दरम्यान अटकेतील संशयित एका वृत्तवाहिनीशी संबंधित असल्याची चर्चा आहे.

या फसवणूक प्रकरणात यापुर्वी चार जणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी सुनिल शिवाजी माळी (वय ४२, लिंगनूर, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. दोन वर्षांपूर्वी कॉलीटॉस अ‍ॅग्रो व ड्रिम मल्टिट्रेड सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला दहा ते वीस टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यामध्ये सुनील शिवाजी माळी यांच्यासह व्यंकटरमन ओबलेस मसराज (रा. वान्लेसवाडी), नितीन गजानन कोंगनोळीकर (वसंतनगर), शौकत अब्दुलकलाम नायकवडी (रा. सांगली) या चौघांनी ५० लाख ४९ हजार रुपयाची गुंतवणूक केली. 

संशयितांनी ग्वाही दिल्याप्रमाणे परतावा देण्यास टाळाटाळ झाली असे फिर्यादीची तक्रार आहे. त्यानंतर सर्व फिर्यादिनी संशयितांकडे वारंवार पैशाची मागणी केली. पण त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यातील रवींद्र कांबळे यास आज पोलिसांनी अटक केली. यापुर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.