गोळीबाराने हादरला..
सातारा : पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर धरण परिसरातील कार्बन नाका येथे झालेल्या गोळीबाराने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. राजकीय वैमनस्य आणि पवनचक्कीतील पैशांच्या वादातून शिंदे गटाचा कार्यकर्ता आणि ठाण्याच्या माजी नगरसेवकाने केलेल्या गोळीबारात दोघेजण ठार झाले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ठार झालेले आणि जखमी हेसुद्धा शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते.
याप्रकरणी गोळीबार करणारा माजी नगरसेवक मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मदन कदम आणि ठार झालेले दोघे तसेच जखमी यांच्या पवनचक्कीमधील पैसे आणि राजकीय वैमनस्य होते. पवनचक्कीच्या पैशांवरून त्यांच्यात सतत वाद होत होता. त्या पैशांच्या वसूलीतूनच मदन कदम याने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धरण परिसरात झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण होते. शिवाय तेथील ग्रामस्थही भीतीच्या छायेखाली असल्याचे सांगण्यात आले. गोळीबाराची ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.