Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या करणारी आई....

पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या करणारी आई....


बेल्जियममधील महिलेने पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या केली होती. आता 16 वर्षांनंतर तिला विनंतीनुसार इच्छामरण देण्यात आलं. 2007 मध्ये बेल्जियममधील एका महिलेने स्वतःच्या पाच मुलांची हत्या केली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर, जिनेव्हिव्ह लरमिट नावाच्या महिलेच्या वकिलाने गुरुवारी (2 मार्च) सांगितलं की, हत्येप्रकरणी 16 वर्षांनंतर तिला विनंतीनुसार इच्छामरण देण्यात आलं.

पोटच्या चार मुलांचा चिरला गळा

जिनेव्हीव्ह लरमिटने 28 फेब्रुवारी 2007 रोजी तिने पाच मुलांची हत्या केली. निव्हेलस शहरात ही घटना घडली होती. तिच्याच घरात स्वयंपाकघरातील चाकूने तीन ते 14 वयोगटातील तिच्या पाच मुलांचा गळा चिरला. यामध्ये एक मुलगा आणि चार मुलींचा समावेश होता. ही घटना घडली त्यावेळी जिनेव्हीव्ह लरमिटचा नवरा घराबाहेर होता.

मुलांच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पाच मुलांची हत्या केल्यानंतर जिनेव्हीव्ह लरमिटने स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण तिने चाकूने वार केल्यानंतर आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. यामुळे या महिलेचे प्राण वाचले. जिनेव्हीव्ह लरमिटला 2019 मध्ये उपचारासाठी मानसिक रुग्णालयात हलवण्यात आलं. 2008 मध्ये तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जिनेव्हीव्ह लरमिटचे 56 वर्षीय वकील निकोलस कोहेन यांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, हत्येच्या 16 वर्षांनंतर मंगळवारी (28 फेब्रुवारी) त्याच्या क्लायंटला इच्छामरणाच्या विनंतीनुसार मृत्यूदंड देण्यात आला.

इच्छामरणाची दिली परवानगी

बेल्जियमचा कायद्याअंतर्गत इच्छा मृत्यूला परवानगी देण्यात येते. जर लोकांना असह्य मानसिक आजा, शारीरिक आजाराने ग्रस्त असल्याचे मान्य झाल्यास कायद्याअंतर्गत बेल्जियमध्ये इच्छामरणाची परवानगी दिली जाते. यासाठी एखाद्याच्या निर्णयाची जाणीव असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्याची इच्छा तर्कसंगत आणि सुसंगतपणे कायद्यापुढे व्यक्त करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जिनेव्हीव्ह लरमिटच्या वकिलाने सांगितलं की, ही एक विशेष प्रक्रिया आहे, ज्या जिनेव्हीव्ह लरमिटने विनंती केली होती. तिच्या मानसिक स्थिती संबंधित विविध वैद्यकीय मतांनुसार परवानगी देण्यात आली.

''... म्हणून केली मुलांची हत्या''

लरमिटला गंभीर मानसिक समस्या होती. ती मानसिक आजाराने त्रस्त होती आणि नियमितपणे मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेत होती. लरमिटने पोलिसांना सांगितलं की, घरातील ताणतणाव आणि त्रासामुळे तिने तिच्या मुलांची हत्या केली.

जिनेव्हिव्ह लरमिटला जगण्याची इच्छा नव्हती

मानसशास्त्रज्ञ एमिली मारोइट यांनी आरटीएल-टीव्हीआय चॅनेलला माहिती देताना सांगितले की, लरमिटने कदाचित 28 फेब्रुवारी रोजी आपल्या मुलांची हत्या केल्यानंतर मरण्याचा निर्णय घेतला. मारोइट म्हणाल्या की, तिने जे सुरु केलं ते तिला संपवायचं होतं. मुळात तिला तिचं स्वत:चं जीवन संपवायचं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.