Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एमसी स्टॅनचा लाइव्ह शो बजरंग दलाने बंद पाडला?

एमसी स्टॅनचा लाइव्ह शो बजरंग दलाने बंद पाडला?


मुंबई : 'बिग बॉस १६' चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅनची क्रेझ ही संपूर्ण जगभरात आहे. त्याचा शो पाहण्यासाठी लाखो चाहते येतात. दरम्यान, एमसी स्टॅनच्या याच शोसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. इंदूरमधील त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट बंद पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्टॅनचा चालू शो बजरंग दलाने बंद पाडला आहे. या शोमध्ये रॅपरला मारहाण करत धमकावल्याचाही आरोप आहे.

‘बिग बॉस १६’ नंतर आता एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट घेत आहे. १७ मार्च रोजी इंदूरमध्ये त्याचा शो सुरु होता. दरम्यान, बजरंग दलाच्या लोकांनी या शोमध्ये जाऊन एकच गोंधळ घातला. या सगळ्यात आता एमसी स्टॅनचे चाहते ट्विटरवर त्याला पाठिंबा देत आहेत. बजरंग दलाची माणसं मंचावर कशी पोहोचली, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. कोणत्याही सुरक्षा रक्षकांनी त्यांना का रोखले नाही? भारतात कलाकाराला मान मिळत नाही, असे अनेकजण म्हणत आहेत. या कॉन्सर्टचे काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बजरंग दलाचे सदस्य धमक्या देताना दिसत आहेत. पण एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी बजरंग दलाच्या सदस्यांसमोरच रॅपरला पूर्ण पाठिंबा दिला.

तस पाहिलं तर, बजरंग दल आधीपासूनच एमसी स्टॅनच्या गाण्यांमधील शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याच्या विरोधात आहे. याशिवाय एमसी स्टॅन आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे तरुणाई वाया जाते असा आरोपही बजरंग दलाने केला आहे. दरम्यान, इंदूरनंतर १८ मार्चला नागपुरात एमसी स्टॅनचा लाईव्ह शो आहे. त्यानंतर ४० दिवसांनी तो २८ एप्रिलला अहमदाबादमध्ये शो करणार आहे. दुसऱ्या दिवशी २९ तारखेला जयपूर, त्यानंतर ६ मे रोजी कोलकाता आणि ७ मे रोजी दिल्ली येथे त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.