Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली एलसीबीची कारवाई; रात्रीत सलग घरफोड्या करणाऱ्यास अटक..

सांगली एलसीबीची कारवाई; रात्रीत सलग घरफोड्या करणाऱ्यास अटक..


सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात एकाच रात्रीत औषध दुकाने, दवाखाने, बंद घरे फोडणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 16 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या चोरट्याकडून तब्बल 36.31 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, एक मोपेड, रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

रमेश रामलिंग तांबारे (वय 46, रा. दत्तनगर, पलूस, जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी एलसीबीला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक खास पथक तयार केले होते.

पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी घरफोडयांच्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर संशयित रमेश तांबारे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोपेडवरून सांगलीत येणार असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना खबऱयाद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच रात्रीत अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली.

त्याने तासगाव, कुरळप, इस्लामपूर, कासेगाव, सातारा जिल्ह्यातील वडूज, कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव आदी 16 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून आतापर्यंत 64 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 2 किलोचे चांदीचे दागिने, भांडी, एक मोपेड, 70 हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा 36.31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, विक्रम खोत, संतोष गळवे, उदय माळी, संदीप पाटील, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.