ठाण्यात रविवारी रंगणार महिला गझलकारांचा मुशायरा
ठाणे: गझल मंथन साहित्य संस्था आणि आम्ही सिद्ध लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रविवारी दि. २६ मार्च रोजी राज्यस्तरीय महिला गझल मुशायरा आणि मराठी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार डाॅ. कैलास गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे उपस्थित राहतील. दोन सत्रात कार्यक्रम होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १ गझल लेखन कार्यशाळा होईल. या कार्यशाळेला सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे, सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी मार्गदर्शन करतील. सूत्रसंचालन मानसी जोशी करतील.
दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता महाराष्ट्रातील नामांकित महिला गझलकारांचा गझल मुशायरा रंगणार आहे. या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) राहतील. तर मुशायऱ्यात गझलकारा ज्योत्स्ना राजपूत (पनवेल), सुनीती लिमये (पुणे), उत्तरा जोशी (देवगड), वैशाली शेंबेकर मोडक (डोंबिवली), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), संध्या पाटील (कराड), विजया टाळकुटे (पुणे) आदी सहभागी होतील. सूत्रसंचालन रत्नमाला शिंदे सोनावणे (मुंबई) करतील.हा कार्यक्रम वारकरी भवन, पहिला माळा, राममारुती रोड, गजानन महाराज मंदिराच्या जवळ, आयसीआयसीआय बँकेसमोर ठाणे (पश्चिम) या ठिकाणी होणार आहे. गझल रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, ठाणे जिल्हाध्यक्षा मानसी जोशी व ठाणे जिल्हा कमिटीने केले आहे.-प्रणाली म्हात्रेगझल मंथन मुंबई जिल्हा सचिव, सेक्रेटरी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.