Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रविवारी सांगली नगरीमध्ये रंगणार देश विदेशातील मॅरेथॉन वेड्यांची जत्रा.....

रविवारी सांगली नगरीमध्ये रंगणार देश विदेशातील मॅरेथॉन वेड्यांची जत्रा..



सांगली: शहिद अशोक कामटे स्मृर्ती फाउंडेशन आयोजित व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सहप्रायोजक जागतिक दर्जा प्राप्त शहिद मॅरेथॉन पर्व दहावे असणारी स्पर्धा दि २६ मार्च २०२३ रोजी विश्रामबाग चौक सांगली येथून सुरू होणार आहे.  या स्पर्धा ५ किमी व २१ किमी आशा दोन गटात  होणार आहेत.  या स्पर्धेचा २१किमीचा मार्ग विश्रामबाग चौकातून सुरू होऊन विजयनगर, कृपामाई दवाखाना, वंटमुरे कॉर्नर, मिशन चौकातुन परत त्याच रस्त्याने विश्रामबाग वरून शहिद अशोक कामटे चौक, राम मंदिर, काँग्रेस भवन, किसन चौक, जुना स्टेशन रोड, कापडपेठ, टिळक रोड, आयर्विन पुलापासून परत आलेल्या रस्त्याने विश्रामबाग येथे संपणार आहे. तसेच ५ किमीचा मार्ग विश्रामबाग चौकातून सुरू होऊन अशोक कामटे चौक, राम मंदिर चौकातून परत विश्रामबाग चौक येथे समाप्त होणार आहे. २१किमी स्पर्धा सकाळी ०५:४५ वाजता तर ५ किमी स्पर्धा सकाळी ०८:०० वाजता सोडण्यात येणार आहेत. 

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राबरोबर दिल्ली, लखनऊ, चंदीगड, जयपूर, अहमदाबाद, सुरत, बेंगलोर, अथणी, विजापूर, केरळ यासारख्या शहरातून स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या दशकपूर्ती निमित्ताने विदेशी स्पर्धकही सहभागी झाले आहेत. या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे तसेच सर्व स्पर्धेचे नियोजन एकदम चोख व शिस्तबद्ध करण्यात आले आहे, असे मॅरेथॉन चे चेअरमन समित कदम व संचालक डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी सांगितले. त्यामध्ये महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. 


या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे स्पर्धकांना दिले जाणारे टी शर्ट , मेडल व २१ किमी स्पर्धकांना दिले जाणारे जॅकेट असणार आहे. तसेच स्पर्धकांना धावण्यासाठी ताकद देणारे हायड्रेशन  स्टॉल असणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धकांना मार्गावरती प्रोत्साहन देण्यासाठी चौका चौकात सांगलीतील नामवंत स्कूल पुढे सरसावल्या आहेत. या शाळा आपले झांज, ढोल यासारखी पथक उभी करणार आहेत.  तसेच मॅरेथॉन कामी मदतीसाठी विविध संघटना, सामाजिक संस्था व मंडळे पुढे आली आहेत. सांगलीची ओळख पाहिले गणपती मंदिर तर दुसरी ओळख शहिद मॅरेथॉन अशी  होऊ लागली आहे. यासाठी सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आव्हाहन आयोजकांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.