Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल नांदेडमधये? गुप्तचर विभागाला मिळाली माहिती

खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल नांदेडमधये? गुप्तचर विभागाला मिळाली माहिती


यासाठी महाराष्ट्र पोलिसांना याबाबत सतर्क करण्यात आले असून, शहरातील सर्व रस्ते, प्रवेश मार्ग आणि बाहेर जाण्यासाठी बॅरिकेड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंजाब पोलिसांचे आयजी मुख्यालय सुखचैन सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचा बंदूकधारी गोरखा बाबाचा फोन तपासण्यात आला. त्यात सर्व जण जल्लूपूर खेडाजवळ फायरिंग रेंज बनवून शस्त्रांचा सराव करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. आनंदपूर खालसा फोर्सचे होलोग्राम बनवण्यात आले. याशिवाय शस्त्रे उघडण्याचे आणि एकत्र करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. अमृतपालचा पेहराव अजूनही सेम आहे, पण त्याने पगडी घातली आहे. चष्मा लावलेला आहे. त्याने दाढीसह मिशा बसवल्या असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली आहे.

अमृतपाल बिलगा येथील शेखुवालच्या गुरुद्वारातून लाडोवालला गेला. तिथे नदी पार करण्यासाठी बोट शोधत होतो, पण ती सापडली नाही, म्हणून जुना पूल ओलांडून हार्डीज वर्ल्डला गेलो. तेथून ऑटो घेऊन कुरुक्षेत्रातील शहाबाद येथे आलो. अमृतपाल १९ मार्चच्या रात्री शाहाबादमध्ये बलजीत कौरच्या घरी थांबला होता. ही महिला त्याला अडीच वर्षांपासून ओळखत होती. अमृतपालला आश्रय देणारी महिला ही एसडीएम रीडरची बहीण आहे.

अमृतपाल पंजाबमधून पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो महाराष्ट्रातील नांदेडमध्ये असल्याचा संशय पोलिसांना आहे. पंजाबमधून पळून तो हरियाणाला गेला होता. अमृतपाल महाराष्ट्रातील नांदेडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पंजाब पोलिसांचे पथक तेथे छापा टाकण्यासाठी रवाना झाले आहे. आतंकी हरविंदर सिंह रिंदा याच्यासोबत अमृतपालचे संबंध आहेत. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत रिंदाचं तगडं नेटवर्क आहे. अमृतपालने अशा प्रसंगासाठीच रिंदासोबत संबंध अबाधित ठेवल्याची माहिती आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.