Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट, अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर...

प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट, अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर...


नवी दिल्ली: 2022 च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला कर्नाटकमध्ये लगेच निवडणुका घ्यायच्या होत्या, परंतु नंतर ते मागे हटले, असा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी केला. ते म्हणाले, ‘महापुराप्रमाणे जिल्हास्तरावर अनेक नेते पक्षात सामील होत आहेत, काही दिग्गज नेते सामील होत आहेत. जनमत काँग्रेसच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.’

शिवकुमार पुढे म्हणाले, ‘आमच्या आधीच्या सर्वेक्षणात आम्हाला 136 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, आता आमचा सर्व्हे आम्हाला 140 जागा मिळण्याचा दावा करत आहे. त्यांना जितका जास्त वेळ मिळेल तितका त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल, असे भाजपला वाटते.’ असे अध्यक्ष शिवकुमार यांनी सांगितले. त्यामुळे भाजप असा प्रयत्न करत आहे. दररोज अल्प मुदतीच्या निविदा काढल्या जात आहेत, अॅडव्हान्स दिले जात आहेत, कंत्राटे दिली जात आहेत आणि कोणताही विचार न करता पैसे दिले जात आहेत. त्यावर काँग्रेस विचार करेल आणि सरकारला आपली भूमिका कळवेल, असे ते म्हणाले.

तसेच म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांच्यासह माजी आमदार जीएन नंजुनदास्वामी आणि विजापूरचे आमदार मनोहर ऐनापूर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2022 च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला कर्नाटकमध्ये लवकर निवडणुका घ्यायच्या होत्या, परंतु या निर्णयापासून ते मागं हटले, असा दावाही शिवकुमार यांनी केलाय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.