Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.


गेली आठ दिवस झाले सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवस रात्र बेमुदत आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने कोणताही दखल न घेतल्याने आज गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा सुरेश खाडे यांच्या घरासमोर करणार राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते  यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जनतेचे नोकर मंडल अधिकारी विष्णु यादव व atrocity सारखा गांभीर गुन्हा दाखल असूनही कामावर हजर असणारे तलाठी संभाजी हांगे यांच्यावर बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदी घालून शासनाची फसवणूक केली आहे या दोघांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच सहकार विभागातील अधिकारी गौतम वाघ यांनी आपल्या अधिकार वाणीचा गैरवापर करत बोगस कागदपत्रे बनवून महात्मा फुले मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी संस्थेतील बेकायदेशीर दोन प्लॉट बळकावले आहेत या तिघांची खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.



तसेच या सबळ पुरावे असूनही,वेळेवर निवेदने देऊन ,आंदोलन करूनही दोघांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे व पाठीशी घालणारे मिरज प्रांत,तहसीलदार व सहकार विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावे या व इतर विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्र विकास सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याने जीव मुठीत धरून रात्री अन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसावे लागते, आंदोलनकर्त्यांना कोणतीही सुरक्षा नाही, त्यामुळे आंदोलकांना जिल्हाधिकारी आवारात जागा देण्यात यावी ,बाहेर रस्त्यावर गाडी अंगावरून जाऊन मारण्यापेक्षा अद्याप गेली आठ दिवस होत आली प्रशासनाने कोणताही दखल न घेतल्याने टोकाचे पाऊल उचलत जिल्ह्याचे पालकमंत्री मा सुरेश खाडे यांच्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला वेळेच  प्रसंगावधान राखून तात्काळ पोलिसांना प्रशांत सदामते यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले,सकाळ पासून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरासमोर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.