Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीस गैरकृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीस गैरकृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना सक्तमजुरी




सांगली : सांगली दर्पण

शिक्षणासाठी मुलीला घेऊन जाऊन नंतर तिला जोगव्याच्या कायर्क्रमात नाचायला, गाणी म्हणायला भाग पाडण्यात आले. शिवाय बुलीर् (ता. पलूस) येथे एका मुलाशी तिला जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्या प्रकरणी एका महिलेसह दोघांना १० वषेर् सक्त मजुरी तसेच ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील पन्नास हजार रूपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सांगलीतील जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी ही शिक्षा सुनावली.

शैला देवदासी भोरे (वय ४९, रा. काननवाडी, ता. मिरज), रोहित हणमंत आसुदे (वय २५, रा. नागठाणे, ता. पलूस) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. शैला भोरे याने पीडित मुलीला शिक्षणासाठी नेले होते. त्यानंतर तिचा दोन महीने व्यवस्थित सांभाळ केला. नंतर ती घरकाम करत नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित मुलीला ती जबरदस्तीने नाचण्याचे तसेच देवाची गाणी म्हणायची कामे करण्यास भाग पाडू लागली. आक्टोबर २०१७ मध्ये भोरे हिने तिला बुलीर् येथे उरूसासाठी नेले. तेथे तिची रोहित याच्याशी ओळख करून दिली. नंतर हा मुलगा आपल्या फडात यायला पाहिजे त्यासाठी तिला भूरळ घाल, त्याच्याशी शारिरिक संबंध ठेव असे तिने मुलीला सांगितले.
त्यानंतर रोहित याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. त्यानंतर मुलीला त्रास होत असतानाही तिला रूग्णालयात नेले नाही. नंतर तिला काननवाडी येथे नेऊन तिला झोपडीच्या छताला उलटे टांगून, बेड्या घालून काठीने बेदम मारहाण केली. नंतर मुलीला ती पंढरपूर येथे घेऊन गेली. तेथे एका वयस्कर व्यक्तीशी लग्न कर, त्याच्याकडून सोने, पैसे मागून घे असे सांगितले. मुलीने त्याला नकार दिला. नंतर काननवाडी येथे परतल्यावर भोरे हिने तिला पुन्हा पूवीर्सारखेच उलटे टांगून मारहाण केली. मुलीने तिच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर भोरे आणि आसुदे यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्याची सुनावणी न्या. महात्मे यांच्यासमोर झाली. त्यांनी मुलीचा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून दोघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कुपवाडचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे, भगवान कोळी, पैरवी कक्षातील सुनीता आवळे, वंदना मिसाळ यांचे या खटल्यात सहकार्य लाभले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.