Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जतमध्ये माजी नगरसेवकाच्या खूनप्रकरणी दोघांवर गुन्हा

जतमध्ये माजी नगरसेवकाच्या खूनप्रकरणी दोघांवर गुन्हा  


सांगली : जत येथे शुक्रवारी दुपारी भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांच्यावर गोळीबार करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी जतमधील रेकॅडर्वरील गुन्हेगारासह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हल्लेखोरांचा पोलिस युद्धपातळीवर शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. 

संदीप ऊफर् बबलू चव्हाण याच्या एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत माजी नगरसेवक विजय ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी फियार्द दिली आहे. त्याशिवाय फियार्दीमध्ये भाजपचे नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कायार्लयात अजर् केला होता, असेही फियार्दीत म्हटले आहे. त्यामुळे ताड यांच्या खुनाला राजकीय संघषार्ची किनार असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आतापयर्त खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.  

शुक्रवारी दुपारी विजय ताड त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या जत-शेगाव रस्त्यावरील शाळेत मुलांना आणण्यासाठी कार घेऊन गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर ताड गाडीतून उतरून घराच्या दिशेने पळत सुटले. त्यावेळी हल्लेखोऱांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात जखमी होऊन ते खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. शिवाय दगडही घातला. यात ताड यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशीरा जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयित रेकॅडर्वरील गुन्हेगार

यातील संशयित संदीप ऊफर् बबलू चव्हाण हा पोलिसांच्या रेकॅडर्वरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, लुटमार, चोऱ्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय त्याच्यावर एमपीडीएअंतगर्तही कारवाई करण्यात आली होती. पोलिस त्याच्यासह त्याच्या साथीदाराचा कसून शोध घेत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.