Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनेक आजारांवर ठरते पाणीपुरी गुणकारी !

अनेक आजारांवर ठरते पाणीपुरी गुणकारी !


नवी दिल्ली : रस्त्यावरचे काही पदार्थ इतके चविष्ट असतात की ते रोज खाल्ले तरी मन तृप्त होत नाही. चाट, वडापाव, पाणीपुरी असे चटपटीत पदार्थ खायला कोणाला आवडत नाही ? असेच एक स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, ज्याचा भारतातील लोक मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतात. पोट जरी भरले तरी पाणीपुरीसाठी प्रत्येकाच्या पोटात थोडी तरी जागा असतेच. उकडलेले चणे (रगडा), बटाटे आणि मसालेदार पाण्याने भरलेली पुरी तोंडात जाताच, मन तृप्त होतं. ती केवळ तरुणांनाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच खायला आवडते.

पण आरोग्याच्या दृष्टीने ते फारसे फायदेशीर मानले जात नाही. वजन कमी करणारे, डाएट करणारे अनेक लोकं तर त्याकडे बघतही नाहीत. पण हीच पाणीपुरी अतिशय हेल्दी असते असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का ? ती तयार करण्यासाठी अशा घटकांचा वापर केला जातो, ज्याची गणना पोषण-समृद्ध पदार्थांमध्ये केली जाते. पाणी पुरीची पुरी गव्हाचे पीठ किंवा मैदा, रवा यापासून बनते. तसेच त्यामध्ये उकडलेले बटाटे, , उकडलेले हरभरे याचा रगडा तर पाणी हे पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, मीठ, मिरची पावडर, आमचूर, धणे, गूळ आणि चिंच यापासून तयार केले जाते.

पाणीपुरी खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया

1) निरोगी पचन

: पाणीपुरी ही गहू, रवा, चणे आणि बटाटे इत्यादीपासून बनवले जातात, जे कार्ब आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. याच कारणामुळे पाणीपुरी खाल्ल्याने तुम्हाला भरपूर फायबर मिळू शकते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि ती स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते.

2) वजन कमी करणे

: हे वाचूनतुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की पाणीपुरी खाऊन वजन कमी कसे होऊ शकते ? पण ते सहजपणे शक्य आहे. पाणीपुरीमध्ये भरलेल्या बहुतेक गोष्टी उकडलेल्या असतात आणि त्यात पाणीही असते. यामुळेच त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3) ॲसिडिटीवर उपचार

: ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्टर सामान्यतः जलजिरासारखे थंड पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणीपुरी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जलजिरा, कारण त्याशिवाय त्याची चव अपूर्ण मानली जाते. आले, जिरे, पुदिना, काळे मीठ, धणे आणि कधीकधी काळी मिरी जलजीराच्या पाण्यात टाकतात. या सर्व गोष्टींमुळे खराब पोट बरं होण्यास मदत होते आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते.

4) तोंडाच्या अल्सरवर उपचार

: पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणार्‍या जलजीराच्या पाण्याने तोंडात आलेले अल्सर किंवा फोड बरे होतात.

5) रक्तातील साखर नियंत्रित करते

: कमी कार्बयुक्त सामग्रीमुळे, पाणीपुरी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली सिद्ध होऊ शकते. मात्र त्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर

- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.