Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हनुमाननगर येथील चार एकर जागेवर सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात येणार..

हनुमाननगर येथील चार एकर जागेवर सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात येणार..


सांगली :  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील हनुमाननगर येथील चार एकर जागेवर सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीस अधिवेशनामध्ये केली नाट्यगृह, बहुउद्देशीय हॉल, उपहारगृह, रेस्टरूम, कलादालन, स्वतंत्र फूडमॉलचा यामध्ये समावेश आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांचा शासनाकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याला यश मिळाले आहे.

सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते पण शहरात एकही सुसज्ज नाट्यगृह नाही. त्यामुळे कलाकारासह नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला होता. गेल्या अनेक वर्षापासून शहरात एखादे सुयज्ज नाट्यगृह असावे अशी मागणी सातत्याने कलाकार, नागरिकांच्यामधून होत होती. महापालिकेच्या प्रभाग व क्रमांक १८ मध्ये हनुमाननगर येथिल चार एकर जागा नाट्यगृहासाठी निश्चित करण्यात आली होती. त्याचा ३८ कोटी रुपयांचा आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र निधी मिळत नसल्याने नाट्यगृहाचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला होता.

आमदार सुधीर गाडगीळ यानी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखी इनामदार, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्यासह मुंबई येथे वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाट्यगृहासह विविध विकासकामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये सांगलीतील नाट्यगृहासाठी २५ कोटींच्या निधीची घोषणा केली. यामुळे नाट्यगृहाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.


मंजूर अद्ययावत नाट्यगृहाची इमारत तीन मजली असेल सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश मंदीरातील वैशिष्ट्ये (श्रींची मूर्ती, मंदिराच्या छताचे प्रतिकृती) प्रसिध्द्ध नाटककार याच्या प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे. तळ मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, उपहारगृह, पहिल्या मजल्यावर प्रवेशद्वार, कलाकारांना तयार होण्यासाठी खोली, दुसऱ्या मजल्यावर चार व्हीआयपी सूटस्, रेस्ट रूमचा आराखड्यामध्ये समावेश आहे. नाट्यगृहाच्या पहिल्या मजल्यावर ३७५ तर दुसऱ्या मजल्यावर ३७५ आसन क्षमता आहे. ४८२ वाहनासाठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात येणार आहे. याशिवाय विविध प्रकारची ५००हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये गुलमोहर, बहावा, सप्तपर्णी, रक्तचंदनाच्या झाडांचा समावेश आहे.

नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

सांगली शहरात अद्ययावत नाट्यगृह नव्हते. गेल्या अनेक वर्षापासून नाट्यकलाकार, नाट्यरसिकांकडून याबाबत सातत्याने मागणी होत होती. हनुमाननगर येथे महापालिकेच्या चार एकर जागेवर ३५ कोटींचा सुसज्ज नाट्यगृहाचा आराखडा तयार करण्यात आला होता यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु होता अर्थसंकल्पामध्ये यासाठी २५ कोटीच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतील नाट्यगृहाचा मार्ग मोकळा झाला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.