Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवैध लॅबोरेटरीविरोधात उपोषण; पॅथॉलॉजिस्ट संघटनाही सहभागी..

अवैध लॅबोरेटरीविरोधात उपोषण; पॅथॉलॉजिस्ट संघटनाही सहभागी..


सांगली : जिल्ह्यातील अवैध लॅबोरेटरी बंद करण्याची वारंवार मागणी करूनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौगुले यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटना सहभागी झाली आहे.

पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनीही प्रशासनाकडे अवैध लॅबोरेटरी चालकांवर कारवाईची मागणी केली होती. जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील लॅबोरेटरीची तपासणी करून ज्या लॅबमध्ये पॅथॉलॉजी विषयातील शिक्षण घेतलेले डॉक्टर नाहीत. त्यांच्यावर अवैध समजून महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियमानुसार कारवाईचे आदेश ई दिले होते. त्यानुसार कारवाईही सुरू झाली होती. पॅथॉलॉजिस्टशिवाय चालविलेल्या लॅबोरेटरी अवैध आहेत. अशा ठिकाणी घेण्यात आलेले रिपोर्ट रुग्णाच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार आहे. 


त्यामुळे अशा अवैध लॅबोरेटरीवर कारवाईची मागणी हेमंत चौगुले वारंवार करत होते. मात्र मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकमंत्री, आरोग्य मंत्री व प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. हेमंत चौगुले यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष संदीप यादव, उल्हास माळी, रवींद्र मोहिते, योगेश्री चौगुले, प्रज्ञा चिटणीस, जयदीप पोळ, रवी मन्वर, उत्तम चव्हाण, सतीश संकपाळ, अविनाश वाघमारे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.