Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिलिंडर दराचे गौडबंगाल...

सिलिंडर दराचे गौडबंगाल...


'सिलिंडरचे ऑनलाइन बिल भरले. त्याच्या सात दिवसांनंतर दर वाढल्यानंतरचे अतिरिक्त बिल पाठविण्यात आले. अशाप्रकारे ग्राहकांना लुटणाऱ्या एजन्सीची चौकशी करा. किती ग्राहकांकडून असे अतिरिक्त पैसे आकारण्यात आले, याची माहिती काढा आणि दोन दिवसांत अहवाल सादर करा', असे कडक आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्राहक संरक्षण सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांना दिले.

* मार्चच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर ग्राहकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

* होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ होईल.

* एक तारखेपासून सिलिंडरची बुकिंग करणाऱ्यांकडून वाढीव दर आकारले जात असताना ज्यांनी सात ते आठ दिवसांपूर्वी सिलिंडरचे ऑनलाइन पैसे भरले, त्यांनाही वाढीव बिल पाठविण्यात आले होते.

* 'मटा'ने गुरुवारी याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर एजन्सीचालकाचे धाबे दणाणले. अतिरिक्त बिल पाठविल्यानंतरही ते वसूलच केले नसल्याचेही प्रकार घडले.

* जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे यांना अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या. 

* चमू पाठवून महिनाभरातील सर्व बिलांची तपासणी करण्यात येणार असल्याचे तायडे यांनी सांगितले. आधीच रोष, त्यात लूटही

* गेल्या काही वर्षांत एलपीजीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार १ एप्रिल २०१७ ते ६ जुलै २०२२ दरम्यान या किमती ५८ वेळा बदलण्यात आल्या.

* याचा परिणाम म्हणजे एलपीजी सिलिंडरच्या दरात ४५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढत्या महागाईवर नागरिकांचा रोष असताना एजन्सीकडून लूट होण्याचे प्रकार पुढे आले असल्याने ग्राहक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

* सिलिंडरच्या किमतीत घरपोच सिलिंडर देण्याच्या शुल्काचाही उल्लेख असतो, असे असतानाही ग्राहकांकडून १० रुपये अतिरिक्त आकारले जातात. 

* काही ग्राहक सिलिंडर घरापर्यंत पोहोचविणाऱ्याला स्वेच्छेने पैसे देतात. टीप स्वेच्छेने दिली जाते, त्यासाठी आग्रह नको, अशी अपेक्षाही ग्राहकांनी व्यक्त केली.

असे आकारले जातात दर

एक मार्चपूर्वीचे......

* सिलिंडरची किंमत : १०५१.९०५ रुपये

* सीजीएसटी: २६.२९८ रुपये

एसजीएसटी: २६.२९८ रुपये

* एकूण ११०४ रुपये

एक मार्चनंतरचे....

* सिलिंडरची किंमत : १०९९.५२४ रुपये

* सीजीएसटी २७.४८८

* एसजीएसटी: २७.४८८

*एकूण ११५४.५ रुपये 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.