Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सायबर पोलिसांची कारवाई; आनलाईन फसवणूक करणाऱ्याचे १३ लाख रूपये गोठवले..

सांगली सायबर पोलिसांची कारवाई; आनलाईन फसवणूक करणाऱ्याचे १३ लाख रूपये गोठवले..


सांगली : शहरातील एका महिलेला मुंबई सायबर क्राईम ब्रांच येथून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या पासर्लला कस्टम विभागाने दंड केल्याची बतावणी करून तो दंड आलनाईन भरल्यानंतर महिलेच्या खात्यावरील १३ लाख २९ हजारांची रक्कम आनलाईन ट्रान्सफर करून महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना बुधवार दि. १५ माचर् रोजी घडली. याबाबत सांगली सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने रक्कम ट्रान्सफर झालेल्या खात्याची माहिती घेत त्यावरील रक्कम गोठवली. 

याबाबत डॉ. सोनिया मियापुरम यांनी तक्रार दिली आहे. मियापुरम यांना मुंबईतील सायबर क्राईम ब्रांचमधून वरीष्ठ अधिकारी बोलत असल्याबाबत एक कॅल आला. त्यावेळी फोनवरून बोलणाऱ्याने त्यांचे एक पासर्ल FEdex डिपाटर्मेंटमधून मुंबईतील कस्टम आफिसमध्ये आले असून ते जप्त करून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे मियापुरम यांना सांगण्यात आले. शिवाय तुम्हाला ९८ हजार ३२६ रूपये दंड झाला आहे असेही सांगितले. त्यावेळी मियापुरम यांनी धाबरून ती रक्कम आनलाईन स्वरूपात भामट्याच्या खात्यावर वगर् केली.  

डॉ. मियापुरम यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आल्याने त्यांनी सांगलीतील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथील अधिकारी, कमर्चाऱ्यांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर ती रक्कम येस बॅंकेच्या एका खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने बॅंकेशी संपकर् साधत त्या बॅंक खात्याची माहिती घेतली. तसेच त्या खात्यावरील १३ लाख २९ हजारांची रक्कम पुढील तपासासाठी गोठवण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सायबर पोलिस ठाण्याकडील उपनिरीक्षक रोहिदास पवार, सचिन कोळी, अमोल क्षिरसागर, करण परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.