माजी नगरसेवक खून प्रकरण चारही संशयितांना सात दिवस पोलिस कोठडी
सांगली : जत येथे शुक्रवारी भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही संशयितांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत अद्यापही पसार आहे. त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत.
याप्रकरणी बबलू ऊफर् संदीप चव्हाण, निकेश ऊफर् दाद्या मदने, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान यातील मुख्य संशयित सूत्रधार अद्यारपही गायब आहे. शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास जत-शेगाव रस्त्यावरील एका शाळेजवळ भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा गोळीबार करत डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत चारही संशयितांना एलसीबीच्या पथकाने गोकाक येथे छापा टाकून ताब्यात घेतेल. रविवारी रात्री उशीरा संशयितांकडे पोलिस अधीक्षक डॅ. तेली यांनी कसून चौकशी केली. त्यावेळी बबलू चव्हाण याने उमेश सावंत याच्या सांगण्यावरून हा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिक तपास एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे करत आहेत. दरम्यान मुख्य सूत्रधार उमेश सावंत याचा युद्धपातळीवर शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.