Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण?

भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण?


गोव्यात एका कॉल गर्लने भाजपच्या माजी मंत्र्यांला ( भाजप आमदार ) चपलेने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या बातमीने राजकारणात खळबळ माजली असून तो आमदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे. मारहाण झालेला आमदार हा मध्य प्रदेश मधील असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले हे वृत्त ट्विट केले आहेत. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार भाजप आमदार हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह गोव्याला गेले होते. तिथे त्यांची भेट दलाला मार्फत बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीशी झाली. ती अभिनेत्री कॉलगर्ल म्हणून देखील गोव्यात काम करत होती. एस्कॉर्ट सर्व्हिससाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिली जात असल्याने अभिनेत्री नाराज झाली. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री एवढी संतापली की, तिने या आमदाराला चपलांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या.

हे प्रकरण सार्वजनिक झाल्यास हॉटेलची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता होती, त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने अभिनेत्रीला पैसे देऊन प्रकरण मिटवले आणि तिला बाहेर काढले. महिलांच्या बिलासोबतच आमदाराने हॉटेलच्या रुमच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप आमदार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांकडून ही भरपाई रक्कम घेण्यात आली. यानंतर तिघांनाही हॉटेल व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच हे प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नाही. 

मारहाण झालेला नेता हा भाजपचा माजी मंत्री असल्याचाही उल्लेख या बातमी मध्ये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील याबाबत तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे समजते. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी याबाबत अधिकृत पत्र गोवा पोलिसांना पाठवले होते. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या नावाची माहिती देण्याची मागणी केली होती. याबाबत गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे या घटनेशी संबंधित कुठलीही माहिती नाही आहे. आतापर्यंत तर हे प्रकरण पूर्णपणे बनावट वाटत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पैसे देण्याची वेळ आल्यावर भाजप आमदार खोलीत लपवून बसला

पैसे देण्याची वेळ आल्यावर भाजप आमदार खोलीत लपवून बसला होता. आमदार हॉटेलच्या वरच्या मजल्यावर खोलीत लपून बसला होता, बॉलिवूड अभिनेत्रीने भाजप मंत्र्याला शोधून काढले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजप आमदाराने कॉलगर्लना सांगितले की, आपण दलालाच्या खात्यात रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली आहे. दलाल म्हणाला, रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ही तरुणी एवढी संतापली की, तिने या आमदाराला चपलांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या.

पेपरची कात्रण प्रसिद्ध केल्याप्रकरणी कांग्रेसच्या आयटी सेल विरोधात गुन्हा

"कमलनाथ यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे. पेपरची कात्रण प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाजपने कांग्रेसच्या आयटी सेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. तसेच, आता ते प्रसार माध्यमांचा आवाज देखील दाबण्याचा प्रयत्न करत आहेत."

एस्कॉर्ट सर्व्हिससाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिली जात असल्याने ती नाराज झाली होती. त्यामुळे ही तरुणी संतापली आणि आमदाराला चपलांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या. प्रकरण सार्वजनिक झाल्यास हॉटेलची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता होती, त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने अभिनेत्रीला पैसे देऊन प्रकरण मिटवले. हॉटेल व्यवस्थापनाने दोघांमध्ये मध्यस्थी केली. तसेच हे प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नाही. ही बातमी जेव्हा मध्य प्रदेशामध्ये व्हायरल झाली तेव्हापासून कॉलगर्लने मारहाण केलेला नेता नेमका कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना लागली आहे. तसेच मारहाण झालेला नेता हा माजी मंत्री असल्याचाही बोलले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.