Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण शनिवारी..

कर्मवीर भूषण पुरस्कार  वितरण शनिवारी..


भारती अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ. प्रा. डॉ. शिवाजीराव कदम शिवाजीराव कदम यांना कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार, प्रसिद्ध उद्योजक व सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर सारडा यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार, ऊस संजीवनी ग्रुपचे डॉ. संजीव माने यांना 'कर्मवीर कृषीभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. शनिवारी सायंकाळी चार वाजता डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, कर्मवीर ट्रस्टचे कार्यवाह लालासाहेब थोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२२-२३ चे कर्मवीर भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. डॉ. कदम, सारडा व डॉ. माने यांचा कर्मवीर भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व वैज्ञानिक आणि औद्योगिक महामंडळ (सीएसआयआर) चे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते व आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार सोहळा होणार आहे. 

पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आयसीटी मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. प्रकाश कोंडेकर, फार्मा, सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी विभाग आयसीटी मुंबईच्या डॉ. वंदना पत्रावळे तसेच डॉ. अरविंद देशमुख, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. परशराम पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. संचालक डॉ. एस. पी. मगदूम, प्राचार्य डी. डी. चौगुले, कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.