सलाम नाना.....!
काही नावे पल्लेदार असतात, एखाद्या लांबलचक वाक्यासारखी. काही नावे वजनदार असतात, ती जिभेवरून ओठावर आणताना आपलेही वजन वाढल्यासारखे वाटते. दिलावरखान आयुबखान मुन्सी/पालकर. पल्लेदार आणि वजनदार असं हे नाव. तुमच्या आमच्या नानांच!
नाना पालकर यांचं.
आपण त्यांना नाना म्हणतो.
नाना म्हणजे खरे तर पत्रकारितेतलं एक अजब रसायन. वृत्तपत्राची जेवढी पाने तेवढे विभाग. किंबहुना पानापेक्षा जास्त विभाग. आपणाला हे वृत्तपत्रीय अंतरंग माहीत असतात. पण या अंतरंगात खोलवर जाऊन पत्रकार म्हणून पृष्ठ पानावर आलेला अवलिया माणूस म्हणजे नाना!
चाळीस पन्नास वर्षांपूर्वी वृत्तपत्र क्षेत्रात फाडफाड इंग्रजी बोलणारी जी काही मोजकी मंडळी होती त्यामध्ये नानांचा समावेश करावाच लागेल. नाना म्हणजे एक संवेदनशील माणूस. लोखंडाच चणे खाऊन मोठा झालेला. आज त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस. पण अजूनही तितकाच उत्साह एखाद्या तरुणासारखा. ऐसा काम कभी ना करना के लोग फरियाद करे, बल्की ऐसा काम करना के लोग तुम्हे फिर याद करे! असं यादगार जीवन जगलेल्या आणि जगत असलेल्या नानांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझा सलाम!नंदकुमार ओतारी, ज्येष्ठ पत्रकारआणि सांगली दर्पण परिवार कडून वाढदिवसाच्या शुभेच्या
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.