सातारा येतील एका मॉल मध्ये एकाची पिस्तूल पडल्यानंतर..
ती ठेवताना गोळी उडून कामगारांच्या कंबरेत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.
दुपारी झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन दिवसांपूर्वी फायरिंगने पाटण तालुका हादरला आहे. अशातच सातारा तालुक्यातही फायरची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार पिस्टलधारी व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी ही घटना कशी घडली? पिस्टल परवाना आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.